दौंड : यवत पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या केडगाव पोलीस चौकीतील पोलिस नाईक निखिल रणदिवे यांनी स्वतः च्या व्हाट्सअपवर स्टेटस ठेवून ते शुक्रवारी दुपार पासून अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यांनी स्वतः च्या मोबाईलवर व्हाट्सअप स्टेटस ठेवत मला विविध ठिकाणी कर्तव्य नेमणूक केल्यामुळे आपल्या कुटुंबाला भेटता आले नाही, मुलीच्या वाढदिवसाला जाता आले नाही म्हणून आपल्या जीवाचे बरे वाईट करत असल्याचे स्टेटसमध्ये म्हटले आहे.


पोलीस नाईक निखिल रणदिवे यांचा शोध घेण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच निखिल रणदिवे यांची बदली यवत वरून शिक्रापूरला झाली असून त्यांच्याकडे दाखल गुन्ह्यांची कामे अपूर्ण असून ती कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांना यवत पोलीस स्टेशन मधून सोडण्यात येणार होते तसेच त्यांच्या आणि माझ्या मध्ये कसल्याही प्रकारचे मतभेद नाहीत असे यवत चे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले आहे







