जागतिक दिव्यांग दिनानिमित्त इन्स्पायर्ड विंग्स एज्युकेशन फाउंडेशन ची सुभाष आण्णा कुल बहूविकलांग शाळेला भेट, फळे, खाऊ वाटप करुन दिले योगाचे धडे

दौंड : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त इन्स्पायर्ड विंग्स एज्युकेशनल फौंडेशन तर्फे आज दौंड येथील सुभाषआण्णा कुल बहुविकलांग मुलांच्या शाळेला भेट देण्यात आली. यावेळी या फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी येथील मतिमंद व बहुविकलांग विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना योगा चे काही प्रकार शिकविण्यात आले व सर्व मुलांना फळे व खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी या मुलांनी काढलेले रांगोळी प्रदर्शनची पाहणी फाउंडेशन चे सचिव ॲड. प्रशांत गिरमकर यांनी केली. तसेच भीमा पाटस चे माजी संचालक विजय जगदाळे यांनी मुलांना योगा प्रशिक्षण दिले. यावेळी गणेश हाके सर व इतर शिक्षक हे आवर्जून उपस्थित होते.

घरात एक गतिमंद, विकलांग मुलगा सांभाळणे संपूर्ण कुटुंबाला जड जाते मात्र या ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांना सांभाळण्याचे काम सुभाषआण्णा कुल मतिमंद व बहुविकलांग मुलांच्या शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी करीत आहेत त्यामुळे त्यांचे जितके कौतुक करु तितके थोडे असल्याचे मत इन्स्पायर्ड विंग्स फौंडेशन चे सचिव ॲड. प्रशांत गिरमकर यांनी यावेळी व्यक्त केले.