पुणे : जांबे (ता.मुळशी) येथे सुरू असलेल्या अनधिकृत “मिलेनियम RMC प्लॅन्ट” वर कठोर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी या प्लॅन्ट चे पत्राशेड व RCC वॉल कंपाउंड पोकलेनने हटवून प्लॅन्ट सीलबंद करण्यात आला.


या कारवाईमध्ये सह-आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, तहसीलदार आशा होळकर व अभियंता टीम ने सहभाग घेतला होता. पुणे जिल्ह्यातील PMRDA हद्दीमध्ये अनधिकृत आणि अवैधपणे बांधकामे करण्यात येत असून यावर आता PMRDA ची धडक कारवाई सुरु आहे. अनेकजण pmrda हद्दीमध्ये अवैधपणे प्लॉटिंग करत असून अश्या प्लॉटिंगवरही धडक कारवाई सुरु आहे.
PMRDA च्या परवानगीशिवाय कोणताही RMC प्लॅन्ट सुरू करू नये. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा ईशारा पीएमआरडीए विभागाकडून देण्यात आला आहे.







