अब्बास शेख


दौंड : नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता आज जिल्ह्यात मतदान सुरु आहे. देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी आता वयोवृद्ध मतदार सुद्धा घराबाहेर पडू लागले आहेत. दौंड शहरातील १०६ वर्षांच्या आजीबाईने मतदान केंद्रावर येउन आपले अनमोल मतदान केले आहे. सर्व मतदारांनी पुढे येवून मतदान करावे, असे आवाहनही या आजबाईंनी केले आहे.
आज संपूर्ण जिल्ह्यातील विविध नगरपरिषद, नगरपंचायतींचे उत्स्फूर्तपणे मतदान सुरु आहे. दौंड नगरपरिषदेचे मतदानही सकाळपासून धिम्या गतीने का होईना पण उत्साहात सुरु आहे. सकाळी ७:३० ते ९:३० पर्यंत ५.०४% म्हणजेच ५०,४९० मतदारांपैकी सुमारे २,५४४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या आता हळू हळू वाढत चालली आहे.
मतदान करणे हा आपला हक्क आहे, निवडून येणाऱ्या सदस्यांना मतदार म्हणून आपण हक्काने विकास कामे करण्याबाबत सांगू शकतो. लोकशाहीकरिता आपण काहीतरी केले पाहिजे, या भावेनेने मतदारांनी पुढे येवून मतदानांचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन या अजिबाईंनी केले आहे.







