अब्बास शेख


दौंड : दौंड चा चेहरा मोहरा बदलणारी ही निवडणूक आहे. कायम आरोप केला जातो कि दौंडचा विकास केला नाही पण तो कुणामुळे झाला नाही आणि कुणी होऊ दिला नाही हे मात्र सांगितले जात नाही. मात्र जनतेला सर्व माहित आहे. दौंडमध्ये ३०० कोटींची कामे झाली ती आमच्या कामाची पावती आहे. आम्ही राजकारणासाठी पाठीत खंजीर खूपसत नाही. स्थानिक नेतृत्वावर विश्वास नसल्याने वरिष्ठांना प्रचाराला यावे लागते असा घणाघात दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दौंड नगरपरिषदेच्या निवडणूक सांगता सभेत केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही सांगता सभा पार पडली त्यावेळी ते बोलत होते. आमदार राहुल कुल यांनी पुढे बोलताना, आम्हाला दौंडचा विकास करायचा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आजच्या सभेची गर्दी हे सांगून जाते कि विजय कोणाचा होणार आहे. केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार आहे. आणि सरकारमध्ये मुख्य पद हे मुख्यमंत्र्याचे असते आणि मुख्यमंत्री हेच शासन असते त्यामुळे दौंडचा विकास करण्यात थेट मुख्यमंत्र्यांची आम्हाला साथ आहे त्यामुळे आम्हाला वळण घेऊन जावे लागणार नाही तर आपली थेट कामे होणार आहेत त्यामुळे आता कुणी काहीही टिका, टिप्पणी केली तरी आपण करायची नाही आपण फक्त विकास करायचे हे ठरविल्याने आजच्या सभेत कुणी कुणावर टिका केलेली नाही.
आपल्याला दौंडच्या प्रत्येक गल्ली,बोळीचा विकास करायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे त्यामुळे सर्वांनी कपाट चिन्हा समोरील बटन दाबून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी केले. यावेळी नागरिक हित संरक्षण मंडळ, भाजप, मित्रपक्ष पुरस्कृत दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनाली वीर आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा सांगता सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेला आमदार राहुल कुल यांसह प्रेमसुख कटारिया, मोनाली वीर, इस्माईल शेख, राजू बारवकर, अमित सोनवणे, बापूराव भागवत यांसह अनेक वक्त्यांची भाषणे झाली.







