दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील यवत ग्रामिण रुग्णालयातर्फे दि. 21/11/2020 रोजी कोविड 19 साठी 320 स्वॅप पाठविले होते. या 320 मध्ये 304 शालेय शिक्षक असून 16 हे रूटीन रूग्ण होते.
आलेल्या अहवालामध्ये 304 शिक्षकांपैकी चारजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये जवाहरलाल विद्यालय, केडगाव – 01, फिरंगीमाता विद्यालय, कुरकुंभ – 01. श्री सद्गुरु विद्यालय, देउळगाव गाडा – 02. असे 4 शिक्षक आढळून आले असून यात 03 पुरुष आणि 01महिला शिक्षकाचा समावेश आहे.
रूटीन रूग्णांमध्ये 2 पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये केडगाव येथील एक 42 वर्ष पुरुष आणि भरतगाव येथील 65 वर्षे महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.