सुपरस्टार ‘धर्मेंद्र’ यांची प्रकृती सुधारत आहे, त्यांच्या निधनाची अफवा – ईशा देओल

मुंबई : मुंबई: बॉलिवूडचे ‘हि-मॅन’ अर्थात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या वृत्तानं आज मोठा संभ्रम निर्माण झाला. पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं म्हटलं जात होतं. पण त्यानंतर त्यांची लेक ईशा देओल हिनं धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त फेटाळलं आहे. तसेच हि अफवा असून यावर विश्वास ठेऊ नये असे तिने म्हटले आहे.

विविध चॅनेल्स आणि नेते मंडळींनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे मात्र अजून तसे काही झाले नसल्याचे त्यांच्या परिवाराचे म्हणणे आहे.