दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील ग्रामिणभागामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
दौंड तालुक्यातील केडगाव, यवत, कुरकुंभ, सहजपुर, कासुर्डी या पाच गावांमध्ये 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इरवाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 22 नोव्हेंबर रोजी 209 स्वॅब चाचणीसाठी पाठविले होते. यामध्ये 169 शिक्षकांचा समावेश असून नियमित 40 रुग्ण होते.
या 209 पैकी 05 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 204 जण निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पात्रा कंपनी केडगाव -01, यवत – 01, फिरंगाईमाता विद्यालय कुरकुंभ – 01, सहजपूर – 01 आणि भैरवनाथ मंदिर कासुर्डी -01 अशी गावनिहाय आकडेवारी आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 04 पुरुष आणि 01 स्त्रीचा समावेश असून त्यांचे वयोमान हे 23 ते 65 दरम्यान आहे.