आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार?

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचार संहिता आजपासून लागू होण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी चार वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 246 नगरपालिका आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणूका घेण्यात येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर पुढच्या टप्प्यात 32 जिल्हापरिषद आणि 336 पंचायतसमिती च्या निवडणूका घेतल्या जातील असेही सांगितले जात आहे.

महानगर पालिका निवडणूकानंतर लगेच जिल्हापरिषद आणि पंचायतसमिती च्या निवडणूका घेतल्या जातील अशी शक्यता आहे. मात्र जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका अगोदर महानगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूका घेतल्या जाणार आहेत असे एकंदरीत दिसत आहे.

31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्याव्यात असे आदेश न्यायालयाने दिले होते त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जानेवारी च्या अखेरपर्यंत पूर्ण केल्या जाणार आहेत.

जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या अगोदर महानगरपालिका निवडणूका घेतल्याने याची वातावरण निर्मिती होऊन जिल्हापरिषद आणि पंचायतसमितीच्या उमेदवारांना याचा फायदा होईल असे भाकीत वर्तवले जात आहे.