केडगावमधील रक्तदानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 404 बॅग रक्ताचे संकलन



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यातील केडगाव येथे रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हे रक्तदान शिबिर विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून ठेवण्यात आले होते ज्यामध्ये केडगाव-बोरीपार्धी ग्रामस्थ, कोविड हेल्थ सेंटर दौंड, जैन श्रावक संघ केडगाव, अखिल भारतीय मराठा महासंघ, भारतीय जैन संघटना केडगाव, साई ग्रुप, दौंड तसेच एक मित्र, एक वृक्ष ग्रुप यांचा समावेश होता. रक्त संकलन करण्यासाठी 

रोटरी आणि संजीवनी ब्लड बँक पुणे यांचे सहकार्य लाभले. 

या उत्स्फूर्त रक्तदान शिबिरास दौंडचे विद्यमान आमदार राहूल कुल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे कौतुक केले.

दौंड तालुक्यातील सर्वात कोविड महामारीच्या काळात दौंड तालुक्यात हे सर्वात मोठे रक्तदान शिबिर ठरल्याचे आयोजकांनी सांगितले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना यावेळी थंड पाण्याचा जार मोफत देण्यात येत होता.

हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी धनराज मासाळ, सलमान खान, समीर पठाण, नितिन जगताप, कृष्णा फरगडे, सुनिल सोडनवर, प्रितम गांधी, संदीप कोठारी, महेश गडधे, श्रीकांत हंडाळ या युवकांनी मोठी मेहनत घेतली.