दौंड : आरोग्य दूत आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते अज्जू सय्यद व गणेश आल्हाट यांच्या पुढाकाराने आमदार राहुल कुल युवा मंच तसेच प्रेमसुख कटारिया मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले. युवा वर्गाने शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 48 रक्त दात्यांनी शिबिरामध्ये रक्तदान केले. अनेक गरजूंनी आरोग्य शिबिराचा लाभ घेत नेत्र तपासणी करून घेतली. यावेळी मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी च्या महिला प्रदेश उपाध्यक्षा कांचन कुल यांनी शिबिरास भेट देत शिबिराचा लाभ घेणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली तसेच सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. कांचन कुल यांच्या हस्ते दादांच्या वाढदिवसाचा केक यावेळी कापण्यात आला.
या प्रसंगी माजी नगरसेवक बबलू कांबळे, अकबर सय्यद, अमित सोनवणे, प्रकाश भालेराव, श्रीकांत थोरात, शफी मुलानी, रुपेश कटारिया, फिरोज तांबोळी, फारूक कुरेशी, सुधीर जाधव, आरिफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर समीर कुलकर्णी (पिरॅमिड हॉस्पिटल), राजू शेख, सोमनाथ सोनवणे (ब्लड बँक) यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले. जुबेर सय्यद, तलहा सय्यद, गौस अत्तार, रकीक इनामदार, अयुब शेख, आरिफ मनियार, नईम शेख यांनी शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.







