दौंड : दौंड शहरातील भरवस्तीत असणाऱ्या सहकार चौकातील बंद सदनिकेवर दरोडा टाकून अज्ञात चोरट्याने जवळपास 10 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी अतुल शंकर काळे (वय 47, रा. बाळकृष्ण प्लाझा, फ्लॅट नंबर 11, पाटील हॉस्पिटल शेजारी सहकार चौक, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305, 331(3) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 12:15 च्या दरम्यान घडली आहे.
फिर्यादी यांची बंद सदनिका फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटात ठेवलेले जवळपास 10 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 हजार 500 रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत आहेत.