अख्तर काझी
दौंड : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राजगृह बौद्ध विहार, दौंड येथे विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी सामुदायिक धम्मवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे वाचन करण्यात आले.
यावेळी धम्म अनुयायांनी रॅली काढून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास अभिवादन केले. यावेळी आयु. नारायण चव्हाण आणि पार्टी यांनी सादर केलेल्या धम्मगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमावेळी अश्विन वाघमारे, ओहळ सर, आनंद बगाडे, अनिल साळवे, दीपक सोनवणे, राजू त्रिभुवन, पवन साळवे यांनी धम्म अनुयायांना मार्गदर्शन केले. रविवारी नियमित उपस्थित राहणाऱ्या मुला-मुलींनी धम्म व बाबासाहेबांच्या महान कार्यावर भाष्य केले.