बोरीऐंदी येथे कारमधून 10 लाख 21 हजारांचा गांजा जप्त, महिलेसह 4 जण LCB शाखेकडून जेरबंद



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यातील बोरीऐंदी येथे LCB टीमने 4 आरोपींना गांजासह जेरबंद केले आहे. हे चारही आरोपी अल्टो कारमधून गांजाची वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी अवैध धंदयांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आलेले होते. 

सदर पथकास यवत पोलीस स्टेशन हद्दीत बोरीऐंदी भरतगाव रोडने पेट्रोलींग करीत असताना एक पांढरे रंगाची व काळे रंगाच्या काचा असलेली  मारूती अल्टो कार नंबर एमएच १२ एचएल ४०२१ ही संशयास्पद दिसून आल्याने कारचा पाठलाग करून कारला गाडी आडवी लावली.

यावेळी या कारमध्ये 3 पुरुष व 1 महिला होते, मात्र यातील दोघेजण पळून जाऊ लागल्याने पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले. यामध्ये प्रकाश राजेंद्र जाधव (वय वर्षे २० रा.खराबवाडी ता.खेड जि.पुणे) तानाजी दिगंबर जाधव (वय वर्षे २१ रा.इठा ता.भुम जि.उस्मानाबाद सध्या रा.रूपीनगर, पाण्याचे टाकीजवळ, निगडी पुणे) सुरेश उर्फ अर्जुन दिगंबर पवार (वय वर्षे ५२ रा.बोरीऐंदी ता.दौंड जि.पुणे) 

आणि सौ.द्रौपदा सुरेश उर्फ अर्जुन पवार (वय वर्षे ४७ रा.बोरीऐंदी ता.दौंड जि.पुणे) यांचा समावेश असून त्यांना ताब्यात घेवून अल्टो कारची झडती घेण्यात आली.

झडतीमध्ये कारच्या मागील डिकीमध्ये अवैधरित्या विक्री करणेसाठी बाळगलेला 2 पोत्यामधील 41 किलो गांजा, 3 मोबाईल असा कारसह किं.रु. 10 लाख 21 हजारचा माल मिळून आलेला आहे. सदर मुद्देमाल जप्त करून यवत पोलीस स्टेशनला एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८(ब), २०(ब) २(क) नुसार गुन्हा दाखल  करण्यात आलेला आहे. तसेच आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी यवत पोलिस स्टेशनचे ताब्यात दिलेला आहे.

सदरची कारवाई ही मा.पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो,  बारामती अपर पोलिस अधिक्षक श्री.मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय अधिकारी श्री.राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पो.नि. पृथ्वीराज ताटे, स.फौ. दत्तात्रय जगताप,  पोहवा महेश गायकवाड,

पोहवा निलेश कदम, पोहवा.सचिन गायकवाड, पोना. गुरू गायकवाड, पोना. सुभाष राऊत, सफौ. राम जगताप, पोहवा. काशिनाथ राजापुरे पोकॉ. निलेश चव्हाण, म.पोकॉ. सोनल धुमाळ यांनी केलेली आहे.