केडगाव, दौंड : कष्टकरी माथाडी कामगारांचे आराध्य दैवत आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष क्रांतिसूर्य स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांची केडगाव ता.दौंड येथे जयंती साजरी करण्यात आली.
मराठा महासंघाच्या केडगाव येथील पुणे जिल्हा आणि तालुका संपर्क कार्यालयात जयंतीनिमित्त स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी जिल्हा अध्यक्ष तुषार शेळके, तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख, कार्यालय कामकाज प्रमुख युसुफ शेख, साकेत गोंडाणे, ॲड.प्रियंका अवचट उपस्थित होते.
१९८२ साली मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्वप्रथम आवाज उठवून मुंबईत मंत्रालयावर पहिला मोर्चा काढला. वेळप्रसंगी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.
तरीदेखील तत्कालीन सरकार न्याय देत नाही म्हणून आत्मबलिदान देणारे महान व्यक्तीमत्व आमदार स्व.आमदार अण्णासाहेब पाटील होते. अण्णासाहेब पाटील यांना महाराष्ट्रातील कष्टकरी माथाडी कामगारांचे आराध्य दैवत मानले जाते, माथाडी कामगार जनरल युनियनचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य महान होते.