केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील केडगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, दौंड यांच्या वतीने २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शेतकरी मेळावा आणि स्व.सुभाष आण्णा कुल कृषीभूषण पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला दौंडचे आमदार राहुल कुल हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध शेतकऱ्यांना कृषी भूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले की, आगामी काळात बाजार समितीचे शेतकरी व व्यापारी हिताचे भक्कम धोरण अवलंबविले असून स्वच्छता व सुविधा उभारणी, तसेच यवत व पाटस येथे उप-बाजार स्थापन करण्याबाबत ठोस भूमिका घेण्यात आली आहे. समितीला राजकीय हस्तक्षेप विरहित, पारदर्शक व सक्षम पद्धतीने कायदेशीर चौकटीत राहून काम करण्याचे आदेश दिले असून पुणे जिल्ह्यात अव्वल स्थान प्राप्त करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी आमदार कुल यांनी केले.

या कार्यक्रमाला संस्थेचे सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, माऊली ताकवणे, निळकंठ शितोळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, पोपटराव ताकवणे, अतुल ताकवणे, भिमा पाटसचे माजी संचालक महेश भागवत, धनाजी शेळके, भिमा पाटसचे संचालक तुकाराम ताकवणे, आप्पासाहेब हांडळ, एम. डी. फरगडे, आबासाहेब खळदकर, तानाजी दिवेकर, लक्ष्मणराव रांधवन, अरुण आटोळे, सर्जेराव जेधे यांच्यासह सर्व संचालक, सभासद, हमाल, मापाडी, तसेच पुरस्कार प्राप्त शेतकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.