दौंड : दौंड तालुक्यातील गुणवरे वस्ती येथे नितीन जयवंत गुणवरे (वय 40, रा.गुणवरे वस्ती) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत ज्ञानेश्वर सुभाष गुणवरे (वय-25 वर्षे रा. गुणवरेवस्ती ता. दौंड जि.पुणे) यांनी दौंड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दि. 13/09/2025 रोजी सकाळी गुणवरेस्ती येथे घडली असून खबर देणार यांचा भाउ नितीन हा सकाळी 7:20 च्या सुमारास घरातुन बाहेर गेला होता मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी परत आला नाही, म्हणुन त्याची पत्नी सौ. मनिषा ही त्यास बघण्यासाठी गेली असता नितीन याने लिंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले.
त्यानंतर त्यांनी याबाबत सर्वांना याची माहिती दिल्यानंतर नितीन याला सर्वांनी लगेच खाली उतरवले व त्यास उपचार कामी भिगवण येथील यशोदा हॉस्पीटल येथे घेवुन गेले मात्र डॉक्टरांनी नितीन हा उपचारा पुर्वीच मयत झाला असल्याचे सांगितले. नितीन याच्या आत्महत्येचे कारण समजले नसून घटनेचा पुढील तपास सहा. फौ. मलगुंडे हे करीत आहेत.