दौंड :
आज गुरुवार दि.16 सप्टेंबर रोजी हनुमान मंदिर राहु (ता.दौंड) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 54 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराची सुरुवात राहू येथील सरपंच श्री.दिलीप रामराव देशमुख व प्राथमिक आरोग्य केंद्र राहू येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री.मोहन पांढरे सर यांच्या हस्ते करण्यात आली. राहु येथे कोरोना लसीकरण होऊनही युवकांनी रक्तदान शिबिरासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला हे विशेष.
सदर संकलन केलेले रक्त सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन जिमखाना पुणे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले असून सह्याद्री ब्लड बँकेच्या सौ.अनघाताई पळसकर व इतर सहकारी यांचे विशेष सहकार्य मिळाले.
शिबिरामध्ये राहू चे सरपंच श्री.दिलीप देशमुख, डॉक्टर श्री.मोहन पांढरे, पोलीस पाटील श्री. सुरेश सोनवणे, श्री.रामभाऊ कूल पत्रकार श्री. रवींद्र खोरकर, भारतीय जैन संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. हर्षल भटेवरा, श्री. विशल्या नर्मदा सेवा समितीचे प्रसाद खुंटे, शंभूराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.मनोज नवले, हर्षल चव्हाण, खंडू रणदिवे, तुषार ढमढेरे, निखिल काळभोर किराणा व्यापारी असोसिएशनचे सुनील भटेवरा, अतुल तांबे, धरमचंद भटेवरा, कल्याण तांबे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे लक्ष्मण कदम पाटील, सौ मनीषाताई नवले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराचे आयोजन शंभूराजे युवा प्रतिष्ठान राहू, भारतीय जैन संघटना, दौंड पत्रकार संघ, किराणा व्यापारी असोसिएशन, श्री.विशल्या नर्मदा सेवा समिती व अखिल भारतीय मराठा महासंघाने केले होते.
सध्या कोरोना लसीकरण सुरू असल्यामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे युवकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री हर्षल भटेवरा यांनी केले आहे. आणि कोरोना लस घेतल्यानंतर 14 दिवसांनी व कोरोना झालेल्या व्यक्तींना डिस्चार्ज मिळाल्यानंतर 28 दिवसांनी रक्तदान करता येते अशी माहिती हर्षल भटेवरा यांनी दिली.