Big News : शासकीय सुट्टीत ‛या’ तारखांना दुय्यम निबंधक कार्यालये राहणार सुरू, मुद्रांक जिल्हाधिकारी दिलीप पाटील



पुणे : सहकारनामा ऑनलाइन 

शासनाने दस्त नोंदणीमध्ये मुद्रांक शुल्कात विशेष सवलत दिली असल्यामुळे जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे कामकाज वाढलेले आहे. मुद्रांक शुल्क सवलतीचा सर्वसामान्य जनतेला लाभ घेता यावा यासाठी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये दि. 12, 19, 25 व 26 डिसेंबर, व 26 डिसेंबर या शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्यात येणार आहेत. 

त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या विशेष सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दिलीप पाटील यांनी केले आहे.

सह दुय्यम निबंधक बारामती, सह दुय्यम निबंधक बारामती क्र.-2, दुय्यम निबंधक आंबेगाव, दुय्यम निबंधक भोर, दुय्यम निबंधक दौंड, दुय्यम निबंधक इंदापूर, दुय्यम निबंधक नारायणगांव दुय्यम निबंधक केडगांव, दुय्यम निबंधक खेड, दुय्यम निबंधक खेड क्र.2, दुय्यम निबंधक खेड क्र.3.

तसेच दुय्यम निबंधक लोणावळा, दुय्यम निबंधक मावळ, दुय्यम निबंधक मावळ क्र.2 दुय्यम निबंधक मुळशी, दुय्यम निबंधक मुळशी क्र.2, दुय्यम निबंधक जुन्नर, दुय्यम निबंधक पुरंदर, दुय्यम निबंधक शिरुर, दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे, दुय्यम निबंधक वेल्हा ही कार्यालये सुरू राहणार आहेत.

जिल्ह्यातील नागरिकांनी शासनाने दिलेल्या विशेष सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. पाटील यांनी यावेळी बोलताना केले आहे.