सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांचा हल्ला..

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतं आहे. आमदार सदाभाऊ खोत यांना गोरक्षकांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना पुण्यातील द्वारकाधीश गोशाळेजवळ घडली आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार, गो रक्षकांनी शेतकऱ्यांची जनावरे पकडून ज्या ठिकाणी आणून ठेवली होती ती कोर्टाच्या आदेशाने सोडविण्यासाठी ते तेथे गेले होते. मात्र ज्यावेळी ते पुण्यातील फुरसुंगी येथे असणाऱ्या द्वारकादास गौशाळेत आमदार सदाभाऊ खोत हे पिडीत शेतकरी आणि कार्यकर्त्यांसह गेले त्यावेळी त्यांना तेथे शेतकऱ्यांची जनावरे आढळून आली नाहीत.

यावेळी त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आणि शेतकऱ्यांच्या पकडून आणलेल्या महागड्या म्हशी आणि गाई नेमक्या कुठे गेल्या असा सवाल तेथे उपस्थित केला. त्यावेळी तेथील काही गो रक्षकांनी त्यांना अरेरावी करत धक्काबुक्की केली. या सर्व प्रकरणामुळे व्यथित झालेल्या सदाभाऊ खोत यांनी पुण्यातील पोलिस ठाण्यासमोर आता ठिय्या आंदोलन सुरु केले असून काहीजण गोरक्षणाच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांची जनावरे ताब्यात घेऊन ती परस्पर गायब करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

तसेच राज्यामध्ये गोवंश कायद्याच्या आडोशाने शेतकरी दुधाळ जनावरं विकायला गेले तरी त्यांना मारहाण केली जाते, त्यांची जनावरे जबरदस्तीने नेली जातात. पोलीस स्टेशनला ही जनावरे गेल्यानंतर ती गोशाळेत नेली जातात. त्यानंतर दिवसाला 200 ते 500 रुपये आकारले जाते. याचा निकाल जर वर्षाने किंवा दीड वर्षाने लागला तर शेतकरी दंड भरू शकत नाही.

त्यामुळे ती जनावरे तो माघारी नेत नाही. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील 10 म्हशी आणि त्याची 11 पाडसे ही पुण्यातील द्वारकाधीश गोशाळेत आणण्यात आली होती. आज त्या म्हशी जाग्यावर आहेत की नाही हे पाहायला गेलो होतो. पण गोरक्षकांनी त्याला विरोध केला असं त्यांनी म्हटलं आहे.