दुचाकीवर गुटख्याची तस्करी करणारा पोलिसांकडून जेरबंद, 82 हजारांचा मुद्देमाल हस्तगत



पुणे : सहकारनामा ऑनलाइन

दिनांक १४/१२/२०२० रोजी पौड पोलीस स्टेशन मधील गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या आरोपीचा शोध घेणेकमी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक तसेच पौड पोलिस स्टेशनचा स्टाफ असे संयुक्तपणे पौड पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.

 त्यावेळी घोटावडे फाटा येथे बस स्टॉप जवळ एका राखाडी रंगाची टिव्हिएस कंपनीची ज्युपिटर नंबर MH 14 EX 4314 व त्यावर असलेला इसम नामे मुर्तुजा अश्रफ अन्सारी (वय 59 रा  शिंदेवाडी,कासार आंबोली, ता. मुळशी जि पुणे) हा स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता फूट रेस्टच्या मोकळ्या जागेत काही पांढरी पोती व मागच्या सीट वरही काही पोती वाहतूक करीत असताना मिळून आला.

यावेळी पोलिसांनी त्याच्या ताब्यातील मालाची पाहणी केली असता त्याच्याकडे  विविध प्रकारचे पानमसाला, सुगंधी तंबाखू व गुटखा मिक्स असे एकूण ८ पोती, १ दुचाकी व १ मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ८२,१९४/- चा मुद्देमाल मिळून आला. त्यानंतर मुर्तुजा यास पुढील कार्यवाही करीता पौड पोलिसांचे ताब्यात देणेत आले आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील , उपविभागीय पो. अधिकारी श्रीमती डॉ. सई भोरे पाटील  यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर  घनवट, पोसई अमोल गोरे सहा.फौजदार दत्ता जगताप 

पो.ना सागर चंद्रशेखर, पो.कॉ बाळासाहेब खडके स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी केली आहे.