पुणे – केसनंदजवळ 20 किलो गांजासह 3 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त, LCB आणि लोणीकंद पोलिसांनी पाठलाग करून आरोपीस पकडले



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

पुणे ग्रामिणच्या भागामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) ला पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. 

त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आलेले असून या पथकाकडून अनेक अवैध धंदे करणाऱ्यांना जेरबंद करण्यात येत आहे.

अशाच एका आरोपीला या पथकाने जेरबंद केले असून सदर पथकास लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत वाघोली ते केसनंद रोडने पेट्रोलींग करीत असताना एक चॉकलेटी रंगाची  हिरो डेस्टीनी मोटारसायकल नंबर एमएच १२ एस सी ५०१९ ही संशयास्पद दिसून आली होती. या मोटारसायकलचा पोलीस पथकाने पाठलाग करत त्यास गाडी आडवी लावून त्याची तपासणी केली असता मोटरसायकलवरील इसम अंबु उर्फ अंबादास दशरथ पवार (वय ३५ रा.गायकवाड वस्ती कोलवडी ता.हवेली जि. पुणे, मूळ गाव जेजला ता.भूम जि.उस्मानाबाद) याच्या मोटारसायकलवर असलेल्या पांढऱ्या पोत्यामध्ये अवैधरित्या विक्री करणेसाठी बाळगलेला २० किलो गांजा, २ मोबाईल असा एकूण ३,४७,५००/- ( तीन लाख सत्ते चाळीस हजार पाचशे) रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. 



या पथकाने सदर मुद्देमाल जप्त करून लोणीकंद पोलीस स्टेशनला एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८(ब), २०(ब) 2(क) नुसार सदर इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी लोणीकंद पोलिस स्टेशनचे ताब्यात देण्यात आला.

सदरची कारवाई ही मा.पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, पुणे अपर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, हवेली उपविभागीय अधिकारी सई भोरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पो नि प्रताप मानकर लोणीकंद पो स्टे., सहा.पो.नि. नेताजी गंधारे, पोसई रामेश्वर धोंडगे, पोसई हनुमंत पडळकर, स.फौ. दत्तात्रय जगताप, पोहवा राजू पुणेकर, पोहवा मुकुंद आयचीत, पोहवा.प्रकाश वाघमारे, पोना. चंद्रकांत जाधव, पो कॉ बाळासाहेब खडके, पोकॉ. समाधान नाईकनवरे, पो कॉ अक्षय जावळे, पो कॉ प्रसन्ना घाडगे, म पो हवा जोती बांबळे, म.पोकॉ. सुनीता मोरे यांनी केलेली आहे.