अख्तर काझी
दौंड : दौंड येथील मध्य रेल्वे ज्युनिअर आणि सिनियर या दोन इन्स्टिटयूटच्या निवडणूका दि.27 जून रोजी पार पडल्या. या निवडणुकीत नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (NRMU) या संघटनेने निर्विवाद वर्चस्व प्राप्त करत दणदणीत विजय मिळवला आहे.
एक सचिव, एक खजिनदार आणि 7 कार्यकारी सदस्य असे एकुण 9 जणांचा पॅनल ही निवडणूक लढवत असतो. दोन्ही इन्स्टिटयूट मध्ये 9-0 अशा पुर्ण बहुमताने NRMU चे पॅनल निवडून आले. विरोधात CRMS आणि SRBKU या दोन्ही संघटनेचे संयुक्त पॅनल होते मात्र त्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. NRMU या संघटनेला ऑल इंडिया SC/ST असोसिएशनचे पुणे डिव्हिजन सचिव रवींद्र कांबळे यांनी बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत NRMU ची प्रचारापासून सर्व धुरा पुणे विभागाचे NRMU चे अध्यक्ष कॉ संदीप विजय शेलार यांनी सांभाळली होती. NRMU पुणे विभागाचे सचिव कॉ एम सोलोमन राजु यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
मध्य रेल्वे NRMU चे महासचिव कॉ वेणु पी नायर यांनी सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. ज्युनिअर इन्स्टिटयूटच्या सचिवपदी कॉ साईराज माळी आणि खजिनदार पदी कॉ धनराज मीणा यांची निवड झाली तर सिनियर इन्स्टिटयूटच्या सचिवपदी कॉ अमित अमोलिक आणि खजिनदार पदी कॉ महेश उबाळे यांची निवड झाली. निवडणूक निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना हार घालुन मानवंदना देण्यात आली.