वीज अंगावर पडून मृत्यू झालेल्या संजय जगताप कुटुंबियांना‘आ.कुल’ यांच्या हस्ते 4 लाखांची मदत जाहीर

दौंड : दौंड तालुक्यातील बोरिपार्धी येथे दिनांक १३ जून २०२५ रोजी संजय जगन्नाथ जगताप यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्युनंतर शासकीय मदत मिळण्यासाठी आमदार राहुल कुल यांच्याकडे बोरिपार्धी येथील कार्यकर्त्यांनी मागणी केली होती. आता त्यास यश आले असून मृत्यू झालेल्या जगताप यांच्या कुटुंबियांना आमदार राहुल कुल यांच्या हस्ते 4 लाखांच्या मदतीचे पत्र देण्यात आले आहे.

यासाठी आमदार राहुल कुल यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना देऊन जगताप कुटुंबियांना त्वरित शासकीय मदत मिळावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. या घटनेची सर्व प्रशासकीय पुर्तता करण्यात आल्यानंतर जगताप यांच्या कुटुंबीयांना आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत 4 लाख रुपयांच्या मदतीचे मंजुरी पत्र आमदार राहूल कुल यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी निवासी नायब तहसीलदार श्रीमती ममता भंडारे देशमुख तसेच बोरिपार्धी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.