हॅलो ग्रुप ग्रामिण रुग्णालय काॅर्नर तर्फे वारकऱ्यांना मोफत चहा वाटप

दौंड : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत आलेल्या वारकऱ्यांना हॅलो ग्रुप ग्रामीण रुग्णालय काॅर्नर यवत (ता.दौंड) यांच्या तर्फे मोफत चहाचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाऊसाहेब टिळेकर, वाहीद मुलाणी, घेवारे साहेब, गजानन मेडीकल चे दिवेकर, राजु शेख, फारूक मुलाणी, अजय पांढरे, अझरुद्दीन तांबोळी, गणेश भागवत, मुन्ना तांबोळी, निलेश चौधरी, मयुर वचकल, अरबाज मुलाणी यांनी आलेल्या वारकऱ्यांना चहापाणी देऊन त्यांची सेवा केली. यावेळी ओवेस, हर्षल, मोईन, चैतन्य, वेदांत, वरद यांनी सुद्धा वारकऱ्यांना चहा वाटप करण्यात हिरीरीने सहभाग घेतला.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दिनांक २३ जून रोजी दुपारी दौंड तालुक्यात आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी दौंडचे आमदार राहुल कुल, बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार रमेश थोरात, अप्पासाहेब पवार, वैशालीताई नागवडे, नितीन दोरगे, यवतचे सरपंच समीर दोरगे यांसह दौंड तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.