आरारा..खतरनाक… LCB ने पकडलेल्या ‛त्या’ आंतरराज्यीय टोळीचे ‛खूनी’ कारनामे उघडकीस, सरपंच म्होरक्या असणाऱ्या टोळीत 150 सभासद, टोळीला रसद पुरविण्यासाठी खुनासह 32 गुन्हे करून आले होते पुण्यात.. पकडलेल्या टोळीचा जबाब घेताना घडला हा ‛सिंघम’ मधील सिन, पोलिसही झाले ’हसून हसून लोटपोट’



पुणे : सहकारनामा (अब्बास शेख) 

स्थानिक गुन्हे शाखा (LCB) ने दरोड्याच्या तयारीत असलेल्या  आंतरराज्यीय टोळीला दि. 30 डिसेंबर रोजी   कोरेगाव भीमा येथे पेट्रोलिंग करीत असताना लोणीकंद जवळ जेरबंद केले होते. अगोदर किरकोळ वाटमारी करणारी टोळी असे वाटत असलेल्या या टोळीचे खरे रूप तपासात पुढे आल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले आहेत.

अशी पकडली टोळी..

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत ओमीनी कार क्र TN 55 V 2682 या गाडीमध्ये संशयित इसम येत असताना स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने सापळा रचून सदरची गाडी ताब्यात घेतली. या गाडीत सहा संशयित  इसम मिळून आले होते. त्यांची नावे 1) गणेशन पेयांडी तेवर (वय 48 वर्षे रा साऊथ स्ट्रीट , कोसवा पट्टी कोडी कुलम जि मधुराई राज्य तामिळ नाडू) 2) शिवकुमार करपैया तेवर (वय 39 वर्षे  रा किलपट्टी नादुमाले कुलम ता. उसलामपट्टी  जि मधुराई  राज्य तामिळनाडू) 3) पंडियेन सेहदू वैकट (वय 32 वर्षे रा रामनाड ता रामानदापुरम जि रामेश्वरम राज्य तामिळनाडू)  4) सरवान गणेशन लचामी (वय 30 वर्षे रा सिक्कान्ड जि मधुराई राज्य तामिळ नाडू) 

5) गणेशन ओच्च तेवर (वय 45 वर्ष रा कोडीकुलम ता उसलमलामपट्टी  जि मधुराई राज्य तामिळनाडू ) आणि 6) सेलवराज अंथन उनिखंडी (वय 33 वर्षे रा येदनकुलम ता मधूकुलसर जि रामनदापुरम  राज्य तामिळनाडू ) अशी असून  वरील सर्व इसमांना  ताब्यात घेऊन ज्यावेळी त्यांची चौकशी सुरू केली त्यावेळी पोलिसांना एक मोठी अडचण निर्माण झाली.

पोलिसांना असा आठवला सिंघम मधील तो सिन, आणि पोलिसही खळखळून हसले…

या टोळीतील एकाही सदस्याला मराठी, हिंदी भाषा येत नसल्याने पोलीस त्यांना काय विचारत आहेत हे त्यांना समजत नव्हते अण ते काय माहिती सांगत आहेत हे पोलिसांना समजत नव्हते हा प्रकार पाहून पोलिसांना अखेरीस एका अण्णा टायरवाल्याला तेथे बोलवले आणि सिंघम चित्रपटामध्ये जसा तो अपहरणकर्ता भाषा बोलतो आणि त्याचे ट्रान्सलेट दुसरा इसम करतो तसाच काहीसा सिन सुरू झाला, हा सिन सुरू झाल्यानंतर पोलिसांना सिंघम आठवून अगोदर खळाळून हसू आले, मात्र जसजसे या टोळीचे कारनामे माहितीतून पुढे आले तसे पोलिसही चक्रावून गेले.

8 लाख 38 हजार रूपयांचा मुद्देमाल टोळीकडून जप्त, पण…

ज्यावेळी दुभाषकाच्या मदतीने पोलीस पथकाने त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली त्यावेळी त्यांच्या ताब्यातील गाडीमध्ये विविध कंपनीचे 6 मोबाईल तसेच 2 लहान मोठे लोंखंडी कोयते तसेच लोंखंडी पक्कड, स्क्रू ड्रायव्हर , लोखंडी पान्हे ,  तसेच एकूण 11 तोळे 700 ग्रॅम सोन्याचे दागिने, 100 ग्रॅम चांदीचे दागिने सापडले. हि टोळी ही पुणे नगर-हायवेवर सिगारेटच्या गाडीवर दरोडा टाकून ती लुटण्याचा तयारीत होती. त्यावेळी या टोळीकडून एकूण  8 लाख  38 हजार 638 रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


असा आहे या टोळीचा इतिहास आणि विस्तार…

हि टोळी तामिळनाडू येथील असून ती पुण्यात इतके साहस का करत असेल याची माहिती पोलिसांनी घेतली असता या टोळीचे धक्कादायक वास्तव समोर आले.

या टोळीचा म्होरक्या गणेशन हा त्या गावचा सरपंच असून त्याच्या  टोळीमध्ये 150 सभासद असल्याचे पोलीस तपासात पुढे आले. तसेच सरपंच गणेशन आणि त्याच्या साथीदारांनी गणेशन याचा राजकीय विरोधक असणाऱ्या इसमाचा खून करून ते पुण्यात आले होते. मात्र गणेशनची 150 जणांच्या असणाऱ्या टोळीला रसद पुरविण्यासाठी त्यांनी दरोडे टाकून त्यांना पैसे पुरविण्याचा प्लॅन आखला होता आणि त्या पद्धतीने त्यांनी गुन्हेही केले आहेत जे आता तपासात पुढे येऊ लागले आहेत. या टोळीला पकडल्याची माहिती तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी पोलिसांना संपर्क करून या टोळीवर 32 गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली. तसेच इकडील तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्या गुन्ह्यांच्या तपासासाठी तिकडे वर्ग केले जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

या टोळीला पकडण्याची कारवाई ही पुणे ग्रामिण चे पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, हवेली उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस वरिष्ठ निरीक्षक  पद्माकर घनवट, लोणीकंद पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहा पो नि पृथ्वीराज ताटे, मनोज नवसरे, पो स ई शिवाजी ननवरे, पो स ई हनुमंत पडळकर, सहा फो दत्तात्रय जगताप, दत्तात्रय गिरमकर, राजेंद्र थोरात, पो हवा मुकुंद आयचीत , राजू पुणेकर, निलेश कदम, महेश गायकवाड, उमाकांत कुंजीर, ज्ञानेश्वर क्षीरसागर, प्रमोद नवले

पो ना विजय कांचन, पो ना चंद्रकांत जाधव, राजू मोमिन, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, नितीन भोर, जनार्दन शेळके, पो कॉ बाळासाहेब खडके, धिरज जाधव, पो कॉ उमेश कुतवळ अक्षय जावळे, दगडू वीरकर यांच्या पथकाने केली आहे.