पुणे : सहकारनामा
पुणे जिल्ह्यातील पुणे ग्रामिणच्या अखत्यारीत असणारे लोणी काळभोर पोलीस ठाणे हे पुणे शहरात समाविष्ट होण्याबाबत उद्या निर्णय होणार असून उरुळी कांचन हे मुख्य पोलीस ठाण्याच्या स्वरूपात नावारूपास येणार असल्याच्या वाटाघाटी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
लोणीकाळभोर बरोबरच लोणीकंद आणि हवेली ही पोलिस ठाणी तसेच पुणे शहर पोलिस दलातील हडपसर, चंदननगर व चतुःश्रुंगी या सहा पोलिस ठाण्याचे विभाजन करण्याबाबत लोकप्रतिनिधी व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक उद्या सोमवारी मुंबई (मंत्रालय) येथे होणार आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या कार्यालयातून हि माहिती एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
सध्याचे हवेली, लोणी काळभोर, लोणीकंद अशा 6 पोलिस ठाण्यांच्या विभाजनाबरोबरच लोणी काळभोर पोलीस ठाणे व नव्याने तयार होणारे वाघोली पोलिस ठाणे शहर पोलिस दलात सामाविष्ठ करण्याबाबतची मुख्य चर्चा होणार आहे.
याबाबत अधिक माहिती नुसार जरी लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे विभाजन होऊन ते शहरात गेले तरी मात्र नव्याने निर्माण होणारे उरुळी कांचन पोलिस ठाणे हे पुणे ग्रामिण मध्ये राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.