दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यातील बोरीपार्धी या गावच्या 3 जागा बिनविरोध झाल्या असून आता उर्वरित 14 जागांवर निवडणूक होणार आहे.
अभिषेक थोरात हे वार्ड क्रमांक 5 मधून बिनविरोध झाले असून या ठिकाणी त्यांच्यासोबत ओबीसी महिला कॅटेगिरीतून रोहिणी दत्तात्रय नेवसे या बिनविरोध झाल्या आहेत. 5 क्रमांकाच्या या वार्डमध्ये संपत मगर, गणेश महाडिक आणि गणेश ताडगे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे ही जागा बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली.
वार्ड क्रमांक 6 मध्ये भोसले या महिला या अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत.
अभिषेक थोरात हे भीमापाटस कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन आनंद थोरत यांचे पुत्र असून माजी स्व.आमदार काकासाहेब थोरात यांचे नातू आहेत.