शॉक लागून आई, वडील, भाऊ गेल्याने तिच्यावर आभाळ कोसळले, घरात एकटीच उरलेल्या वैष्णवी ने हिम्मत न हारता १०वी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील दापोडी या गावामध्ये १७/०६/२०२४ रोजी भालेकर कुटुंबासोबत एक भयंकर घटना घडली होती. अंघोळीला गेलेल्या सुरेंद्र देविदास भालेकर (वय ४५ वर्षे) यांना शॉक लागला होता. त्यांना वाचविण्यासाठी गेलेली त्यांची पत्नी आदिका सुरेंद्र भालेकर, (वय ३८ वर्षे) आणि मुलगा प्रसाद सुरेंद्र भालेकर (वय १९ वर्षे) यांनाही शॉक लागून या तिघांचाही यात मृत्यू झाला होता.

ही घटना १७/०६/२०२४ रोजी घडली होता. तर दहावीचे वर्ष असल्याने भालेकर यांची मुलगी वैष्णवी ही अतिरिक्त क्लासला गेल्याने ती एकटीच यातून बचावली होती. वैष्णवीसाठी हा सर्वात मोठा आघात होता मात्र या आघातातून सावरत वैष्णवीने दहावीची परीक्षा दिली अण काल लागलेल्या निकालात तिचा पहिला नंबर आला. तिच्या या संपूर्ण लढ्यात तिला तिची आत्या आणि दापोडी ग्रामस्थांनी मोलाची मदत केली. एकीकडे संपूर्ण कुटुंब जाण्याचे दुःख अण दुसरीकडे दहावीच्या परीक्षेत आलेला पहिल्या क्रमांकाचा आनंद अश्या या स्थितीमध्ये वैष्णवीच्या डोळ्यांतून येणारे आश्रू थांबत नव्हते.

कु.वैष्णवी सुरेंद्र भालेकर
ही नाथनगर विद्यालय बोरिपार्धी, सेमी इंग्लिश माध्यमामध्ये दहावीचे शिक्षण घेत होती. तिला वर्ग शिक्षक सोनवणे सर, मुख्याध्यापक कांबळे मॅडम, श्री. स्वामी समर्थ क्लासेस आणि अभी रुपनवर यांचे मार्गदर्शन लाभले. वैष्णवीला दापोडी ग्रामस्थांच्या सहभागातून शैक्षणिक मदत निधी म्हणून अडीच लाखांची निधी जमा करून देण्यात आला.

वैष्णवी ही शाळेमध्ये अतिशय हुशार बुद्धिमत्ता असणारी आणि मेहनती, कष्टाळू विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख आहे. इतक्या मोठ्या संकटातही तिने हार मानली नाही आणि आई, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द तिने शेवटपर्यंत सोडली नाही आणि त्यामुळेच तिला हे यश मिळाले आहे अश्या शब्दांमध्ये
दापोडी ग्रामस्थ तीचे कौतुक करत असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.