इंटरनॅशनल :
अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आलेले निकाल हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात गेले आणि ट्रम्प यांचा पराभव झाला. ट्रम्प यांचा झालेला पराभव ट्रम्प यांच्यासह त्यांच्या समर्थकांच्या अतिशय जिव्हारी लागला असून त्यांनी आज अमेरिकेत लोकशाही मूल्ये पायदळी तुडवत मोठा हिंसाचार केला आहे.
ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील अमेरिकन संसद कॅपिटल इमारतीत घुसत मोठी तोडफोड करण्यास सुरुवात केली. दरम्यान आंदोलकांना आवरताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये भयंकर झटापट झाली. यामध्ये एका आंदोलनकर्त्याचा मृत्यूही झाल्याची माहिती मिळत असून तेथील वातावरण चिंताग्रस्त बनले आहे.
दरम्यान वॉशिंग्टन DC मध्ये उद्भवलेली हिंसक परिस्थिती आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे आलेले तीन ट्वीट्स यामुळे ट्विटरने तातडीने ट्रम्प यांचे अकाउंट ब्लॉक केले आहे. तसेच हे तीन हटवा अन्यथा अकाउंट कायम स्वरूपी ब्लॉक केले जाईल असे ट्विटरने जाहीर केले आहे. तसेच नागरी अखंडत्व धोरणाचे वारंवार आणि भयंकर उल्लंघन ट्रम्प यांनी केले आहे असे ट्विटरने म्हटले आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी हे तीन ट्विट्स न हटवल्यास ट्रम्प यांचे अकाऊण्ट लॉक राहील असे त्यांनी जाहीर केले आहे.
याबाबत आता या हिंसारचाराबाबत संपूर्ण जगातून प्रतिक्रिया येऊ लागल्या असून भारतानेही याबाबत आपली प्रतिक्रिया देताना हिंसेचा मार्ग योग्य नसल्याचे म्हटले आहे.