अपहरणाच्या गुन्ह्यातून चौघांची निर्दोष मुक्तता

दौंड : 2019 साली दौंड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झालेल्या चौघांची दौंड न्यायालयाकडून सबळ पुराव्या अभावी अखेर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड न्यायालय कक्षेत येणाऱ्या दौंड पोलीस ठाण्यात कल्याण सोपान पाचपुते, दत्तात्रय मुरलीधर पाचपुते, संदीप विष्णू पाचपुते व कानिफ रामभाऊ सूर्यवंशी यांच्यावर 2019 साली भा. द. वि. कलम 363, 143, 147 नुसार गुन्हा दाखल झाला होता.

सदर आरोपिंची न्यायलयात साक्षी पुरावे तपासल्यानंतर सबळ पुराव्या अभावी अपहरणाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोपींच्या वतीने ॲड. प्रशांत गिरमकर यांनी काम पाहिले.