दौंडमध्ये ‘झूम बराबर झूम शराबी’.. अण थेट गजाआड

दौंड : दारू पिऊन वाहने चालवू नका असे आवाहन अनेकवेळा पोलिसांकडून केले जाते मात्र तरीही पोलिसांच्या या आवाहणाकडे दुर्लक्ष करून हे दारुडे ‘झूम बराबर झूम शराबी’ म्हणत आपल्या हातातील वाहने सैरावैरा पळवताना दिसतात. असाच एक प्रकार दौंड शहरात घडला असून दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या या महाभागावर दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यास गजाआड केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुजल विशाल सरोदे (वय-20 वर्षे,रा.गवळी वस्ती, दौंड) हा दिनांक 04 मे रोजी सायंकाळी 7.00 च्या सुमारास दौंड-सिध्दटेक-सिध्दार्थनगर रोडवर आपल्या ताब्यातील वाहन रस्त्याने वेडेवाकडे चालवत जात असताना रोडवर दौंड चे पोलीस अर्जुन पांडुरंग नरळे, सपोफौ/चौधरी, पो.काँ. बंडगर हे नाकाबंदी करत होते. यावेळी सदर इसम त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप गाडी MH 42 M 6641 ही वेडी वाकडी चालवीत घेवुन येत असताना त्यांना दिसला.

या वाहन चालकाकडून त्याच्या हातून एखादा अपघात घडू नये म्हणून पोलिसांनी त्यास इशारा करून थांबवीले. त्यावेळी पोलिसांना त्याची हालचाल संशयास्पद वाटत होती तर तोंडातुन आंबट, उग्र वास येत होता. त्यामुळे या इसमाने कोणत्यातरी मादक द्रव्याचे सेवण करून गाडी चालवत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यावेळी सदर इसमाची मा. वैद्यकीय आधिकारी सो उपजिल्हा रुग्णालय दौंड येथे तपासणी केली असता मा. वैद्यकीय अधिकारी सो. दौंड यांनी सदर इसम सुजल विशाल सरोदे याने दारूचे सेवण केले असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यामुळे आरोपी सुजल विशाल सरोदे याच्यावर दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार रमेश साळुंके करीत आहेत.