‛दौंड आणि बारामती’ तालुक्यातील गंभीर गुन्हे उघडकीस आणणाऱ्या LCB च्या ननावरे आणि जाधव यांचा पोलीस अधिक्षकांकडून ‛सन्मान’



पुणे : सहकारनामा (अब्बास शेख)

पुुणे जिल्ह्यात असणाऱ्या दौंड  

आणि बारामती तालुक्यातील महत्त्वाचे गंभीर गुन्हे उघडकीस आणून आरोपींना जेरबंद करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे आणि पोलिस कॉन्स्टेबल धिरज जाधव यांना मा पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख साहेब यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.

हा सन्मान त्यांनी विविध गुन्हे प्रकटीकरण केल्याबद्दल करण्यात आला असून या सन्मानामुळे आम्हाला कामाप्रति अजून मोठे बळ मिळाले असून नवीन चेतना निर्माण झाली असल्याची भावना या दोन्ही पोलिसांनी बोलून दाखवली.

बारामती विभाग व दौंड विभागातील खून, जबरी चोरी, दरोडा अवैद्य गावठी पिस्तूल बाळगणारे इत्यादी दाखल गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना जेरबंद केले आहे. तसेच कापूरहोळ, सातारा रोड येथे पोलिसाचा वेश करून ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकला होता. सदर आरोपींना पकडून जेरबंद केले त्याबद्दल माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी त्यांना प्रशस्तीपत्रक  देऊन सन्मानित केले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे आणि पोलिस कॉन्स्टेबल धिरज जाधव हे स्थानिक गुन्हे शाखा Lcb मध्ये कार्यरत असून त्यांची कामगिरी आणि त्यांचे झालेले कौतुक पाहून पोलीस यंत्रणेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. तर त्यांच्या सोबत काम करणाऱ्या त्यांच्या साथीदारांकडून त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले जात आहे.