दौंड : दौंड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 32 तोळे सहा ग्रॅम आणि रोख 10 हजार अश्या 20 लाखाच्या ऐवजाची चोरी कारण्यात आली आहे. याबाबत कोमल राहुल नगरकर (वय 32 वर्षे व्यवसाय घरकाम रा. जुना बुधगाव रोड पंचशिल नगर मारुती मंदिर जवळ सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
कोमल नगरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 22/4/2025 रोजी 10 ते दिनांक 22/4/2025 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास सांगली ते अहिल्यानगर या एसटीने त्या दौड येथे जात असताना व प्रवास करुन दौड येथील त्यांचे मामा सुनिल नगरकर यांचे राहत्या घरापर्यंत जात असताना त्यांचे व त्यांची बहीण कल्याणी व चुलत सासु जयश्री यांचे एकुण 19 लाख 86 हजार रुपये किंमतीचे 32 तोळे 6 ग्रॅम सोन्याचे दागिने व 20 भार चांदीचे दागिणे आणी 10 हजार रुपये रोख रक्कम असे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले असल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
तसेच फिर्यादी यांची आई सुनिता रोहीदास पन्हाळकर हिची ओपन बायपास सर्जरी केली असल्यामुळे सदरची घटना ऐकुन तिला धक्का बसला. त्यामुळे वरील सर्वजण तिचेवर उपचार करणेसाठी तिला सांगलीला घेवुन आले व तिचेवर उपचार करुन पोलीस ठाण्यात तक्रार देणेसाठी आलो असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास दौंडचे पो.स.ई कदम हे करीत आहेत.