दौंड : महिलांना भेडसावणाऱ्या जीवघेण्या आजारातून त्यांना बरे करण्यासाठी आता केडगाव येथील लवंगरे मॅटर्निटी हॉस्पिटल पुढे सरसावले आहे. या हॉस्पिटलकडून उद्या मंगळवार दिनांक 29 एप्रिल रोजी महिला गर्भाशय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सुमारे १ लाख रुपयांचे ऑपरेशन अवघ्या ३० हजारांत केले जाणार आहे. तर पिवळे आणि दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड असणाऱ्या महिलांचे ऑपरेशन मोफत केले जाणार आहे. या शिबिराला दौंडच्या माजी आमदार रंजनाताई कुल या उपस्थित राहणार असून यावेळी त्या उपस्थित महिलांना संबोधित करणार आहेत.
गर्भाशयासंबंधीच्या आजाराबाबत महिला अगोदर हे आजार लपवतात, दुर्लक्ष करतात. मात्र हाच आजार ज्यावेळी गंभीर स्वरूप धारण करतो त्यावेळी मात्र त्यांना मोठ्या खर्चिक शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागते. अनेक महिला आर्थिक अडचणीमुळे वेळीच या शस्त्रक्रिया करून घेत नाहीत आणि त्यांना शेवटी प्राणास मुकावे लागते. या सर्व बाबी लाक्षत घेऊन केडगाव येथील डॉ. स्वाती लवंगेरे यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात सुमारे १ लाखाचे ऑपरेशन अवघ्या ३० हजारांत केले जाणार आहे तर पिवळे आणि दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड असणाऱ्या महिलांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. या सर्व शस्त्रक्रिया अनुभवी सर्जन एम.डी डिग्री प्राप्त गोल्ड मेडलीस्ट डॉ.आशिष काळे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहेत.
या शस्त्रक्रिया उत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या आधारे आणि अतिशय सोप्या पद्धतीने करण्यात येणार असून सकाळी ऑपरेशन झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत रुग्णाला आपल्या घरी जाता येणार आहे. त्यामुळे या सुवर्ण संधीचा फायदा गर्भाशया संबंधीचे आजार असणाऱ्या सर्व महिलांनी घ्यावा असे आवाहन जेष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्वाती लवंगरे यांनी नागरिकांना केले आहे.
ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी 98197 31111 या नंबरवर संपर्क साधून त्वरित आपली नाव नोंदणी करायची आहे. एका दिवसात (Lap-Hys) गर्भ पिशवी काढण्याचे ऑपरेशन फक्त रु २९,९९९ करण्यात येणार असून सकाळी रुग्ण ॲडमिट झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.
हॉस्पिटलचा पत्ता :- लवंगरे मॅटर्निटी अँड इन्फर्टिलिटी हॉस्पिटल, पहिला मजला, महालक्ष्मी मंदिर शेजारी, केडगाव स्टेशन, ता. दौड, जि. पुणे (पूर्वनोंदणी आवश्यक) नाव नोंदणी संपर्क क्रं. +91 98197 31111