दौंड : सहकारनामा
हिवाळा ऋतू सुरू असताना आणि कडाक्याची थंडी जाणवत असताना अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने दौंड तालुक्यात बळीराजा चिंताक्रांत बळीराजाच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे.
आज दौंड तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाच्या हलक्या बरसायला सुरुवात झाली आहे.
या पावसामुळे रब्बी पिके संकटात सापडली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सध्या हीच परिस्थिती दिसत असून कोकणमध्ये गेली चार दिवस सतत पावसाच्या सरी बरसत असल्याने तेथील थंडी गायब होऊन उकाडा वाढू लागला आहे. अवकाळी पावसामुळे कोकणची खासियत असणारा आंबा, काजू, कोकम ही पिके धोक्यात आली आहेत.