देशातील ‛या’ 7 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग! अनेक ठिकाणी पक्षी मरून पडले



नवी दिल्ली : सहकारनामा

देशात बर्ड फ्लूच्या घटना वाढू लागल्या आहेत. आता देशातील 7 राज्यांमध्ये याचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे.  दरम्यान, हरियाणाच्या पंचकुला येथील काही पोल्ट्रीफार्म मध्ये बर्ड फ्युची लागण झाल्याचे नमुन्यांमधून स्पष्ट झाल्यानंतर हरियाणा सरकारने येथील 1.60 लाखाहून अधिक पक्ष्यांना मारण्याची योजना आखली आहे.

बर्ड फ्लूची लागण झालेल्यामध्ये  केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेशच या राज्यांचा समावेश आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे छत्तीसगड, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये देखील काही पक्षांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. मॅट मृत्यू नेमके कोणत्या कारणामुळे झाले याचा अजून अहवाल आलेला नाही. येणाऱ्या अहवालात पुढील बाबी स्पष्ट होणार असल्याची माहिती  केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाने दिली आहे.

केंद्र सरकारकडून बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या राज्यांना हा आजार रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत. बर्ड फ्लूचा संसर्ग केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या  7 राज्यांमध्ये आढळून आला आहे. तर मिळत असलेल्या माहितीनुसार छत्तीसगडमध्येही बालोद जिल्ह्यामध्ये 8 आणि 9 जानेवारीला अनेक कोंबड्या आणि जंगली पक्षांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या ठिकाणी आता राज्य सरकारने RRT पथकाची नियुक्ती करून येथील पक्षांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

महाराष्ट्र राज्यातील बीड, परभणी, मुंबई, ठाणे, दापोलीतही पक्षांचे संशयास्पद मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. या सर्व मृत पक्षांचे नमुने NIHSAD ला बर्ड फ्लू चा सर्वात जास्त फटका केरळ राज्याला बसला असून ज्या ठिकाणी बर्ड फ्लू ची पुष्टी झाली आहे त्या जिल्ह्यांमध्ये संसर्ग झालेल्या पक्षांना मारण्याची योजना अंतिम टप्प्यात आहे.