Bird Flu : राज्यात बर्ड फ्लू चा शिरकाव, मात्र धोका टाळण्यासाठी करा हा उपाय नाही – पशु संवर्धन मंत्री



मुंबई : 

देशात आलेली बर्ड फ्लू (Bird Flu) ची साथ आता महाराष्ट्रातही दाखल झाली असल्याने या साथीला रोखण्यासाठी राज्य सरकार ही तत्पर झाले आहे.

बर्ड फ्लू चा धोका ओळखून राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी जनतेला आवाहन करताना तुम्ही 

 चिकन, अंडी खाताना ते सत्तर डिग्री सेल्सिअस तापमानावर अर्धा तास शिजवावे आणि मगच खावे असा सल्ला दिला आहे. 

हे आवाहन करतानाच त्यांनी बर्ड फ्ल्यू Bird Flu बाबत कोणतीही शहानिशा न करता कसल्याही अफवा पासरविल्यास अशा लोकांविरोधात थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मंत्री सुनील केदार यांनी हे आवाहन एका पत्रकार परिषद केले आहे.

राज्यात  बर्ड फ्लू Bird Flu च्या साथीला परभणीतून सुरुवात झाली आहे. मात्र राज्यात अन्य ठिकाणी अजून तरी याबाबतपुरावे सापडलेले नाहीत.

राज्यात ह्या भयंकर असणाऱ्या साथीचे निदान अजून झालेले नाही त्यामुळे अंडी आणि चिकन तुम्ही खाऊ शकता परंतु ते किमान 70 ते 80 डिग्री तापमानावर अर्धा तास शिजवलेले असावे आणि नंतर खावे असे त्यांनी सांगताना हे आपण सांगत नसून हे संशोधनातून सिद्ध झाले आहे असे केदार यांनी सांगितले आहे.