ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मोठा शस्त्र साठा जप्त, LCB शाखेची मोठी कारवाई



पुणे : सहकारनामा

पुणे जिल्ह्यामध्ये दिनाक  15/1/2020 रोजी ग्रामपंचयात निवडणूका असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सूचना दिल्या आहेत. या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी जिल्ह्यात पेट्रोलिंग सुरू केले होते.

दिनांक 13/1/2020 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खेड विभागात पेट्रोलिंग करत असताना 2 इसम खेड बस स्टॅन्ड जवळ अवैद्यरित्या पिस्टल विक्री साठी घेऊन येणार असल्याची त्यांना माहिती मिळाली होती.

लागलीच त्यांनी टीम सह त्या ठिकाणी जाऊन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांचा अधिक संशय आल्याने पोलिसांनी त्यांची अंग झडती घेतली असता दोघांच्या कमरेला प्रत्येकी 2 असे एकूण देशी बनावटीचे 4 पिस्टल व त्यामध्ये प्रत्येकी 2 असे 8 राउंड असा एकूण 1,74,800 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

पिस्टल सापडलेल्या आरोपींमध्ये 1) प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ (वय 28 रा. वाळद, ता. खेड, जि.पुणे) आणि 

2) निलेश उर्फ दादा राजेंद्र वांझरे (वय 24,रा. वांझरवाडी, ता. दौंड, जि. पुणे)

या दोघांचा समावेश असून सदर आरोपींची वैदकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाई साठी खेड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक  विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोसई श्री, अमोल गोरे, पोहवा जनार्दन शेळके, पोना राजू मोमीन, पोशी अमोल शेडगे, पोशी मंगेश भगत, पोशी बाळासाहेब खडके, पोशी अक्षय नवले, पोशी अक्षय जावळे, सफो दत्तात्रय जगताप, सफौ शब्बीर पठाण, पोहवा विद्याधर निच्चीत, पोहवा मुकुंद आयाचित, पो ह प्रमोद नवले, पोना सागर चंद्रशेखर, पोशी प्रसन्न घाडगे यांनी केली आहे.