‛Murder’ किरकोळ कारणावरून दौंडमध्ये एकाचा ‛खून’



दौंड : सहकारनामा

ऊस तोडीच्या किरकोळ कारणावरून मारहाणीत दौंडमध्ये एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. याबाबत दौंड पोलीस ठाण्यात मृत व्यक्तीचे नातेवाईक भट्टा गुलसिंग ब्राह्मणे यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी आरोपी घनश्याम भोसले, भागवत भोसले व सौरभ (संपूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि. ११/०१/२०२१ रोजी रात्री ९:०० वा. सुमारास काळेवाडी, ता. दौंड, जि. पुणे येथील जमिन गट नं. २५६ मध्ये मयत सुनील सत्यनारायण उर्फ गुलाब शर्मा आणि त्याचे नातेवाईक साध्या कोपीत राहत होते. ते राहत असलेल्या कोपी जवळ शेतमालक किसन आश्रु भोसले याची दोन मुले व त्यांच्यासोबत एक आरोपी असे  मोटरसायकलवरून हातात लोखंडी

गज, लाकडे घेवुन आले आणि त्यांनी आज ऊस तोडणी करावयास शेतात का आले नाही असे म्हणून लोखंडी गज, लाकडे याने परवत गुलसिंग ब्राम्हणे व सुनिल सत्यनारायण उर्फ गुलाब शर्मा याला मारहान केली. या मारहानीत सुनिल हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्यास औषधोपचार दरम्यान सिव्हील हॉस्पीटल, अहमदनगर येथे अँडमीट केले असता औषधोपचार दरम्यान तो मयत झाला.

त्यामुळे फिर्यादी यांचा आते भाऊ सुनिल सत्यनारायण उर्फ गुलाब शर्मा, याला आरोपी यांनी मारहान केल्यामुळे झालेल्या जखमांतुनच त्याचा मृत्यु झाला असल्याची फिर्यादी यांची  खात्री झाली आणि त्यांनी मारहाण करणाऱ्या या आरोपींविरुद्ध कायदेशीर तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.