पुण्यात टेम्पो जळून खाक; चौघांचा होरपळून मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : पुण्यात एका टेम्पोला आग लागून चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये ही घटना घडली असून कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोला ही भीषण आग लागून यामध्ये चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये टेम्पो जळून खाक झाल्याने या घटनेचे गांभीर्य लक्षात येते. या घटनेत मृत्यूमुखी पडलेले चौघेजण हे येथील एका ग्राफिक्स कंपनीचे कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे.

या टेम्पो मध्ये एकूण 12 कर्मचारी प्रवास करत होते. हा टेम्पो हिंजवडी फेज वनमध्ये जवळ असताना या टेम्पोतील चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली त्यामुळे चालक आणि समोरील बाजूस बसलेले कर्मचारी त्वरित खाली उतरले. मात्र, मागील दरवाजा न उघडल्याने चौघांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.