निवडणुकीचा जल्लोष आला अंगलट, DJ लावणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील मिरवडी गावात डीजे लावून निवडणुकीचा जल्लोष करणाऱ्यांवर शासकीय आदेशाचा भंग केल्याचा आरोप ठेऊन डीजे चालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत यवत पोलीस कर्मचारी अजिंक्य दिलीप दौंडकर (वय ३३ वर्षे, व्यवसाय – नौकरी रा, यवत पोलीस स्टेशन ता.दौड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीनुसार १) वैभव लक्ष्मण खोत (रा.उरुळीकांचन  ता.हवेली जि. पुणे 

२) अक्षय अशोक जाधव (रा.सुभाषनगर ३/१५१ येरवडा पुणे)

३) आशीष तुकाराम पाटील (रा.उरुळीकंचन ता हवेली जि पुणे)

या तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.१९/०१/२०२१ रोज़ी १९:४५ वा फिर्यादी यांना मिरवड़ी (ता.दौंड) या गावात डी जे चालू असल्याची माहिती मिळाली त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी  जाऊन पाहणी केली असता तेथे डी ज़े चा मोठा आवाज़ चालू होता. यावेळी फिर्यादि यांनी डीजे चालक मालकचे नाव विचारले असता त्याने वरील आरोपी क्र. १ असल्याचे संगीतले तसेच आरोपी क्र. २ व ३ यानी म.पो.का.क १९५१ चें कलम ३७(१) व (३) चा आदेश जारी असताना सदर आरोपी मजकुर यांनी आदेशाचा भंग केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करून घेताना अंमलदार ASI लोणकर हे होते तर या गुन्ह्याचा अधिक तपास अंमलदार पो ना बानसोडे हे पोलीस निरीक्षक बी.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.