Lockdown : लॉकडाउन काळात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत गृहमंत्र्यांची मोठी घोषणा



मुंबई : सहकारनामा

लॉकडाउन Lockdown काळामध्ये संचारबंदी असताना नियम मोडणाऱ्यांवर पोलीसांकडून 188 कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांबाबत आता राज्य सरकारने मोठी घोषणा केली असून नियमानुसार न्यायालयीन प्रक्रियेचे पालन करून हे गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म असणाऱ्या ट्विटरवर हि माहिती दिली आहे.

लॉकडाउन सुरू झाल्यानंतर नागरिकांना एक दुसऱ्यापासून होणारा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र तरीही नागरिक घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करीत होते. त्यामुळे पोलिसांनी संचारबंदी मोडणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. आता हे गुन्हे मागे घेतले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.