दौंड : दौंड तालुक्यातील यवत येथे एका विवाहितेने सासरकडील मंडळींच्या जाचास कंटाळून इलेक्ट्रिक हिटर आपल्या छातीस कवटाळून इलेक्ट्रिक शॉक घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत कविता बापू ढेरे (रा.महंमदवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
कविता ढेरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी धनश्री हीस तिची सासु शर्मीला राजाराम करडे, तिचा पती, दिर
व तिची नणद हे धनश्री हिस तुला स्वयंपाक निट येत नाही असे म्हणून तिचा वेळोवेळी सर्वासमोर अपमान करून, चारचाकी गाडी घेण्यासाठी हुडयांची मागणी करून शिवीगाळ दमदाटी करून तिला मानसीक तसेच शाररीक त्रास देवुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.
या जाचाला कंटाळून धनश्री हिने ईलेक्ट्रीक हिटर चालु करून तो हिटर स्वत:चे छातीचे खालील बाजुस लावुन आत्महत्या केली असल्याचे म्हटले आहे.
या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी शर्मिला राजाराम करडे, अजित राजाराम करडे, सुजित राजाराम करडे (सर्व.रा.यवत,ता.दौंड) तसेच सौ.पूनम कैलास खैरे (रा.खामगाव फाटा, ता.दौंड) यांच्यावर शाररिक,मानसिक छळ करणे व आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक घाडगे करीत आहेत.