अख्तर काझी
दौंड : महाराष्ट्र भूषण श्री छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर पुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीर राहुल सोलापूरकर याचा शहरातील सर्वच पक्षाच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. थोर पुरुषांच्या विषयी अवमानकारक भाषा वापरणाऱ्या नराधम सोलापूरकर विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी सर्वपक्षीय मागणी सुद्धा करण्यात आली आहे.
दलित संघटनेचे पदाधिकारी अमित सोनवणे, प्रमोद राणेरजपूत ,सागर उबाळे, निखिल स्वामी यांच्या पुढाकाराने पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाला येथील सर्व पक्षांनी पाठिंबा दर्शविला. सचिन कुलथे ,सचिन गायकवाड, संजय चितारे ,फारुख कुरेशी ,फिरोज तांबोळी ,प्रभाकर कोरे, चांद शेख, यादव जाधव, अमित कदम, राजेंद्र सोनवणे, विनायक मोरे, महेश जगदाळे आदी उपस्थित होते.
आंदोलनावेळी राहुल सोलापूरकर याच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. पोलीस प्रशासनाला सर्वपक्षीय निवेदन यावेळी देण्यात आले. सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बेताल व वादग्रस्त वक्तव्य केले आहे, याचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध होत आहे. या नराधमाविरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.