डी.एस. कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्याद्वारे ‘कर्करोग जनजागृती उपक्रम’

दौंड (केडगाव) : वाखारी ता.दौंड येथील श्री धनाजी शेळके कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी पथनाट्याचे आयोजन केले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी कर्करोगाचे प्रकार, लक्षणे व कर्करोग टाळण्याचे मार्ग आणि उपचार पद्धती याविषयी पथनाट्यातून संदेश दिला.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून धूम्रपान, मद्यपान, अस्वच्छ आहार आणि बैठ्या जीवनशैलीमुळे कर्करोग होण्याची शक्यता कशी वाढते याबाबत माहिती सादर करण्यात आली आणि वेळेत कर्करोगाचे निदान झाल्यास कर्करोगावर यशस्वी उपचार कसे करता येतात याची माहितीही देण्यात आली.

डी.एस. कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष वाघमारे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत कर्करोगासारख्या गंभीर आजाराबाबत जी जनजागृती केली ते खूपच प्रशंसनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून केडगाव शहरातील मुख्य चौकात हा जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा.विकास गडधे व इतर प्राध्यापक उपस्थीत होते.