अख्तर काझी
दौंड : दौंड मधील वकील ॲड. अमोल काळे यांची भारत सरकारच्या नोटरी पदी निवड करण्यात आली आहे. त्यांना ऑनलाइन द्वारे नोटरी अधिकारी म्हणून निवड झाल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार विविध ठिकाणचे नोटरी पदे जाहीर करण्यात आली होती. केंद्र सरकारने 2023 मध्ये ऑनलाईन मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत ऍड. अमोल काळे उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे त्यांची नोटरी पदी निवड करण्यात आली.
दौंडचे आमदार राहुल कुल, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी त्यांचे अभिनंदन केले असून शहरातील सर्वच राजकीय पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने ॲड. अमोल काळे यांचे अभिनंदन केले जात आहे.