‘स्पेस ऑन व्हील्स’ आपल्या भेटीसाठी 17 डिसेंबरला येत आहे ‘रँचो गुरूकुल’ मध्ये

दौंड : रँचो गुरूकुल, इस्रो आणि विज्ञान भारती यांच्या विद्यमाने इस्रोच्या संदर्भात यशोगाथा प्रदर्शित करण्यासाठी ‘इस्रोची गगन भरारी महाराष्ट्रात वारी ‘ या अभियाना अंतर्गत मंगळवार दिनांक १७ / १२/ २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ‘स्पेस ऑन व्हिल्स ‘ ही बस रँचो गुरुकुल एज्युकेशन सोसायटीच्या रँचो गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल वाखारी (तालुका दौंड, जिल्हा पुणे) येथे येणार असून या फिरत्या अंतरीक्ष यात्रेचा आपल्या दौंड तालुक्यातील सर्व प्राथमिक , माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयातील इच्छुक शिक्षक व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन रँचो गुरुकुल स्कुल तर्फे करण्यात आले आहे.

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था सगळ्या भारतीयांचा अभिमान चांद्रयान, मंगलयान, आदित्य L 1 अशा यशस्वी मोहिमा आजवर इस्रोने पार पाडलेल्या आहेत. अवकाशाला गवसनी घालणार्‍या भारताच्या यशाची ही कहाणी सामान्य जनतेपर्यंत पोहोचायला हवी म्हणून इस्रो ने एक नवा उपक्रम सुरू केला आहे तो म्हणजे स्पेस ऑन व्हिल्स. स्पेस ऑन व्हील ची ही विशेष बस सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आणि पुण्याच्या दौंड तालुक्यामध्ये या अद्भुत बसची सफर करण्याची सुवर्ण संधी दौंडकरांना चालून आली आहे.

स्पेस ऑन व्हील्स ला भेट दिल्याने विद्यार्थ्यांना खालील गोष्टींची माहिती पाहायला मिळणार आहे-

  1. इस्रोचे प्रतिष्ठित रॉकेट आणि उपग्रह मॉडेल
  2. चांद्रयान -१ आणि मंगळयान मोहिमा
  3. भारतीय रिमोट सेन्सिंग आणि सॅटॅलाइट कम्युनिकेशन तंत्रज्ञान
  4. अंतराळवीराचे दृश्य आणि चांद्रयान -२ अंतराळयानासह चंद्राच्या पृष्ठभागाचे इमर्सिव्ह डिस्प्ले.

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर फक्त व्हॉट्सअप मेसेज करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. व्हाट्सअप मोबाईल नंबर – 9096929324
सौ मोहिनी गायकवाड (प्राचार्या)
रँचो गुरूकुल स्कूल, वाखारी