pulse polio : उप मुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ‛दौंड’ च्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ



दौंड : सहकारनामा

राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते दौंड तालुक्यात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पल्स पोलिओ pulse polio लसीकरण मोहिमेचा आज शुभारंभ करण्यात आला.

पोलिओ या आजाराने मागील काही दशकांमध्ये अनेक चिमुरड्यांचे आयुष्य उध्वस्त केले होते. त्यामुळे या आजाराला हरविण्यासाठी त्याची माहिती पुढील प्रमाणे देत आहोत..

पोलिओ म्हणजे विषाणूमुळे मुलांमध्ये येणारा लुळेपणा. हा आजार बहुतेेक दोन  वर्षाखालील मुलांना होतो. काही देशांत हा रोग अजून टिकून आहे. मात्र प्रगत देशांमध्ये आणि मुख्यतः राहणीमान सुधारल्याने तो नष्ट झाला आहे. पाच वर्षे वयापर्यंतच्या लस न दिलेल्या सर्व मुलांना- विशेषतः पावसाळयात याच्यापासून धोका असतो. हा आजार झालेली 80 टक्के मुले एक ते दोन वर्षे गटातील असतात.

जिथे सांडपाणी, मैला यांची नीट विल्हेवाट होत नाही व पिण्याचे पाणी अशुध्द असते.  तिथे याचा धोका जास्त असतो. म्हणूनच हा रोग टाळायचा असेल तर सर्व मुलांना पोलिओ लस देणे व पाणी शुध्द ठेवणे, मैला-पाण्याची योग्य विल्हेवाट व स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून प्रत्येक मुलाला जन्मल्यानंतर 1/2 दिवसांत व त्यानंतर दीड महिन्यापासून पोलिओचे डोस द्यावेतच. प्रत्येक महिन्यास एक याप्रमाणे 5 डोस द्यावेत. अर्धा तास आगे-मागे अंगावर पाजू नये. नाहीतर लसीचा परिणाम कमी होण्याची शक्यता असते. 

ही लस उन्हात ठेवली असेल, बर्फाच्या किंवा तितक्याच थंड वातावरणात ठेवली नसेल तर त्या लसीची शक्ती कमी होत जाते. ही लस थंड ठेवण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे. इतर अनेक आजारांप्रमाणेच स्वच्छता, पाणी शुध्दीकरण, राहणीमान यांबरोबर पोलिओचे प्रमाण आपोआप कमी होते.