Maan ki baat : लाल किल्ल्यावर तिरंग्याच्या झालेल्या अपमानाने आपल्या खुप दुःख झाले : पंतप्रधान मोदी



नवी दिल्ली – 

26 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारात तिरंग्याचाही जो अपमान झाला त्याचे आपल्याला खूप दुःख झाले आहे अशी प्रतिक्रिया देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ‘मन की बात’ Maan ki baat या कार्यक्रमातून देशातील नागरिकांशी संवाद साधताना दिली आहे.

यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करताना प्रजासत्ताक दिनी अनमोल कार्य करणाऱ्या असामान्य नागरिकांचा देशाने पद्म पुरस्कार देऊन  गौरव केला आहे. परंतु त्यांनी केलेले कार्य आणि दिलेले योगदान या बद्दल आपण सर्वांनी माहिती करून घेणं महत्वाचं आहे असं सांगत या व्यक्तींबद्दल आपल्या कुटुंबाला माहिती होणं गरजेचं आहे त्यामुळे या लोकांपासून प्रेरणा मिळते असे ते म्हणाले. 

आपल्या मन की बात कार्यक्रमात त्यांनी विविध पैलूंवर बोलताना देश स्वतंत्र होऊन  पंचाहत्तरीच्या अमृतमहोत्सवात आला आहे. ज्या महान स्वातंत्र्य सेनाणींमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या देशाच्या महान लोकांच्या  संबंधित असणाऱ्या स्थानिक स्थळांचा शोध घेण्याचा हा काळ असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी देश कोरोना विरोधात कसा लढला यावर भर देत  भारतात जे वॅक्सिन अभियान सुरू झाले आहे ते निश्चित जगाला भारताची ख्याती दाखवून देणारं असल्याचं सांगितले आहे.

यावेळी त्यांनी क्रीडा जगतावर भाष्य करताना या महिन्यात क्रिकेट पिचवरूनही अतिशय चांगली बातमी मिळाली असं म्हणत मोदींनी भारतीय टीमच्या विजयाबद्दल सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.